पुस्तकेआहे कठीण परि...

 

आहे कठीण परि हो आनंददाता
तू मूलतत्त्व त्याचे जाणून घेता

वरील दोन ओळी डोळ्यासमोर ठेवून पुढील लेख लिहिले आहेत. हे लेख वाचून लोकांना गणिताबद्दल गोडी वाटायला लागेल अशी अपेक्षा करणे चुकीचेच  नव्हे तर वेडेपणाचेही ठरेल. पण हे लेख वाचून गणिताची भीती किंवा नावड थोडी जरी कमी झाली तरी मला खूप समाधान वाटेल. गणिताच्या अभ्यासकांना मात्र ह्यात नवीन काही मिळणार नाही याची नम्र जाणीव आहे.


क्रांतिवंदन

ज्या क्रांतिकारकांच्या मुळे देश पारतंत्र्यातून मुक्त झाला,ज्यांनी क्रांतीच्या आसक्तीपायी सर्वस्वाचा होम केला मात्र आज जे विस्मृतीच्या पडद्या आड गेले आहेत किंबहुना माहीतही नाहीत त्यांना ही मानवंदना.ज्यांनी आयुष्य म्हणजे काय हे धड पाहील देखिल नव्हतं त्यांनी ते आयुष्य हसत हसत आपल्या ध्येयावरून ओवाळून टाकलं त्यांना ही मानवंदना. ऐन विशीत देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीरांचे चरित्र वाचताना डोळ्यापुढे कुसुमाग्रजांच्या शब्दांचा प्रत्यय येतो -

गीताई

मराठीतील अभूतपूर्व अनुवादित ग्रंथ 'गीताई' अमृतमहोत्सव साजरा करत आहे. विनोबांच्या ह्या महान कार्याला उजागर करण्यासाठी इथे संपूर्ण गीताई लिहावी असा प्रस्ताव नरेंद्र गोळे ह्यांनी करून सुरुवात केली आणि अथक परिश्रमांतून त्यांनी घेतलेला ध्यास पूर्णत्वास नेला. त्यांच्या प्रयत्नातून नेटवर अवतीर्ण झालेली आमच्या कल्पनेप्रमाणे गीताईची ही दुसरी आणि युनिकोडमधील पहिलीच प्रत असावी.


प्रेमाची सुनीते

सुनीतामध्ये चौदा ओळींच्या शार्दूलविक्रीडितात बारा ओळींमध्ये एक विचार आणि शेवटच्या दोन ओळींत कलाटणी असते.

शार्दूलविक्रीडित वृत्ताशी झटापट करता करता आचार्य अत्र्यांची झेंडूची फुले, दिवाकरांच्या नाट्यछटा, सॉमरसेट मॉम् आदींच्या काही साहित्यकृती, काही चुटके, काही ऐकलेल्या गोष्टी, आणि बरेच सहनशील श्रोते मित्र ह्या सगळ्यांचे मिळून जे काय रसायन तयार झाले ते म्हणजे ही प्रेमाची सुनीते!


शुद्धलेखन

मराठी शुद्धलेखनाविषयीची माहिती ह्या संदर्भग्रंथात संकलित करण्यात आलेली आहे. ह्यातील क्वचितच काही मजकूर स्वतंत्रपणे लिहिलेला आहे. बहुतेक सर्व मजकूर इतर संकेतस्थळांवरून उतरवून घेऊन युनिकोडमध्ये लीप्यंतरित करून येथे उपलब्ध करून ठेवला आहे. मूळ मजकुराचा उल्लेख त्या त्या मजकुराबरोबरच केलेला आहे.


संगणकाची सुरक्षितता

संगणकाच्या सुरक्षिततेविषयीच्या अमित चितळे ह्यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेल्या लेखांचे संकलन ह्या पुस्तकात केले आहे.

ते म्हणतात:

आजकाल घरोघरी संगणक येऊ लागले आहेत. त्याचा (योग्य?) वापरही वाढला आहे. परंतु त्याच्या सुरक्षिततेविषयी कोणाला फारशी माहिती नसते. "हो... एक कुठलासा Antivirus आहे, पण तो कसा वापरायचा ते माहित नाही" अश्या स्वरुपाची उत्तरे मिळतात. व्हायरस म्हणजे काय, काय म्हणजे व्हायरस नाही, तो कसा येऊ शकतो, कसा येऊ शकत नाही वगैरे गोष्टी सर्वसामान्यपणे माहित नसतात. गेली ६-७ वर्षे संगणक अभियंता म्हणून काम केल्यावर यातील बर्‍याच गोष्टींचे ज्ञान मला मिळाले आहे. आपला संगणक सुरक्षित कसा ठेवता येईल याबाबत ४ गोष्टी लोकांना सांगाव्यात, आपले अनुभव लोकांच्या उपयोगी पडावे म्हणून हा लेख प्रपंच...

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा!

              ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

काही महिन्यांपूर्वी माहितीजालावर खालील संकेतस्थळ पाहिले.
http://groups.yahoo.com/group/gajananshegaondevoteeclub/ 
ह्यामध्ये श्री.ज्ञानदेवांच्या हरिपाठावर निरूपण वाचले होते. मनोगतच्या सभासदांना आणि वाचकांना ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील विचारांची / तत्त्वज्ञानाची ओळख व्हावी असा विचार मनात आला होता. विनायक, मंदार आणि श्रावणी ह्या मनोगतींचे प्रोत्साहन, प्रशासकांची अनुमती आणि माझ्या सद्गुरूचे आशीर्वाद ह्या त्रिवेणीसंगमातून माझ्या मनीची मनीषा  आता मनोगतवर प्रगट होवू इच्छीत आहे.आपल्यासारख्या सुजाण वाचकांचा आणि रसिकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.


Typing help hide