विना शीर्षकाची कविता

जयंता ५२


 

कधी एकटीच तू भेटशील.... सांजवेळी
इच्छा उरली.
शक्यता संपून गेली.

"हा बहर सारा तुझ्यासाठी".... म्हणावे कुणी
इच्छा उरली.
शक्यता संपून गेली.

दिवस एक तरी उगवावा.... प्रश्नाविना
इच्छा उरली.
शक्यता संपून गेली.

जाळ सारे आतले बाहेरचे.... विझावे
इच्छा उरली.
शक्यता संपून गेली.

रडेल हे जग.... माझ्या देहावरी
इच्छा उरली.
शक्यता संपून गेली.

यावे का या जगी परतुनी.... पुन्हा
शक्यता खूप आहे.
इच्छाच संपून गेली.