थरथरता अधर अजून का?

कुमार जावडेकर

 

 

मुक्तक

 

भेटीत इतके घडले -
डोळ्यांस डोळे भिडले!
 

ना शब्द अपुरे पडले...
मौनात उत्तर दडले!

 ...................................

 थरथरता अधर अजून का?
भिरभिरती नजर अजून का? 

आकाशी सूर्य नसूनही
तेजाचा असर अजून का? 

आले हे लक्ष्य समीप, मग-
पथ इतका सुकर अजून का? 

आहे परिचित, पण भासते
नवखे हे शहर अजून का? 

(इतका भुर्दंड बसूनही
खर्चाचा कहर अजून का?)

 घेतो मी नियमित श्वास, पण-
जगण्याचा विसर अजून का?