अवघड जाते...

अजब

सोपे जगणे अवघड जाते
सरळ चालणे अवघड जाते…

स्पष्ट बोलणे अवघड जाते
गप्प राहणे अवघड जाते…

तुला टाळणे अवघड जाते
तुला भेटणे अवघड जाते…

जीव लावणे अवघड जाते
अन निभावणे अवघड जाते…

नियम पाळणे अवघड जाते
गुन्हे करणे अवघड जाते

स्वप्न पाहणे अवघड जाते
मनात झुरणे अवघड जाते…

तुला’ सांगणे अवघड जाते
‘मला’ समजणे अवघड जाते…