शिकार

प्रणव प्रियांका प्रकाश

hunt
माझ्यात लपलंय माझं मरण
रक्तातून वाहतंय सगळ्या अवयवांपर्यंत.

की मरण असं काही नसतंच?
आपण असतो पाळीव प्राणी,
मनात असेपर्यंत कोणीतरी पाळतं आपल्याला
आणि अचानक होते शिकार
या शिकारीला आपण नाव दिलंय मरण?

शिकार सावधपणे पाहायला हवी
त्यानंतर सावधपणे व्हायला हवं
पुन्हा पाळीव प्राणी.

paNatee