शेव खमणी

अंजू

जिन्नस :

ढोकळा - अर्धा किलो
फोडणीचे साहित्य (तेल, मोहोरी, हिंग, कढीपत्ता)
शेव - (झिरो नंबरची)
डाळिंबाचे दाणे - अर्धी वाटी
काजू - मूठभर
बारीक चिरलेली कोथिंबीर- मूठभर
चिंचेची गोड चटणी (आवडत असल्यास हिरवी चटणी पण घ्यावी.)
मीठ, साखर - चवीनुसार
ट्रूटी-फ्रूटी - पाव वाटी

क्रमवार मार्गदर्शन :

एका मोठ्या पातेल्यात ढोकळा आधी कुस्करून घ्यावा. तुकडे राहू देऊ नयेत. मग त्यावर फोडणीच्या साहित्याची फोडणी करून घालावी. त्यात डाळिंबाचे दाणे, काजू, ट्रुटी-फ्रूटी, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व साखर घालून हलक्या हाताने कालवावे. खायला देताना त्यावर बारीक शेव आणि चिंचेची चटणी घालून द्यावे.

टीपः काजू फोडणीत तळून घातले तरी चालतील.

phataka