आजची मुलं

मनीषा साधू

mula
मुलींना आठवतील ते दिवस
'आंबा पीकतो रस गळीतो' करीत
हाताखालून जाणारे
आंब्याच्या कमानीसारख्या
मोहरून उठतील त्या
लगडलेल्या सगळ्या आठवणी
पाडाला लागतील
त्या रसदार होऊन उठतील आतून

मुलेही विटी दांडूसारखी
टपाटप उड्या मारतील किंवा
फेकल्या जातील कंपनी कंपनींवर
'खंती'सारखे सपापसप् रुतवतील स्वतःला
सापडलेल्या गाळात
जमेल तितका वेळ, जमेल तसे
तिरपे तारपे

कधी राज्य करतील तर
कधी राज्य देत बसतील पराभव झाल्याने
पण खेळणं सोडणार नाही
ती आजची मुलं आहेत!

kandeel