नित्याचे प्रश्न नि त्यांची उत्तरे - टंकलेखन


मनोगतावर मराठीत टंकलेखन करताना पडणारे प्रश्न

एका सेकंदात थाड थाड मराठी!

येथे सगळीकडे संगणकाचा नेहमीचा (रोमन - इंग्रजी) कीबोर्ड वापरून देवनागरी मराठी लिहिता येते. त्यासाठी लिप्यंतर नावाचे तंत्र वापरण्यात आले आहे. ह्यात आपण जसजशी इंग्रजी अक्षरे टाईप करीत जाऊ तसतसे तोवर झालेल्या शब्दाचे लिप्यंतर लगोलग करून ते आपल्याला देवनागरीमध्ये तेथल्या तेथे मिळते.

सहसा मराठी शब्द इंग्रजीत लिहायची वेळ आल्यावर आपण जसे स्पेलिंग करू, जवळजवळ तसेच इथे करावे लागते. काही अक्षरांच्या आणि जोडक्षरांचा जरा वेगळा विचार करावा लागतो.  ह्या चित्रावर टिचकी मारली तर कुठल्या अक्षरासाठी काय टाईप करायचे त्याचा तक्ता दिसतो, त्यात पाहायचे (आताच टिचकी मारून पाहा!) पुढे सवय झाल्यावर त्याची गरज पडत नाही. ह्या सगळ्यामुळे मराठी देवनागरी टाईप करणे इतके सोपे झाले आहे, की सारखे टाईप करीत राहावेसे वाटते!.

जेंव्हा इंग्रजी शब्द लिहिणे अनिवार्यच असेल तेंव्हा Ctrl-t (म्हणजे Ctrl आणि t ह्या दोन्ही की एकदम) दाबून लिहिण्याची पद्धत मराठीतून इंग्रजीत किंवा इंग्रजीतून मराठीत अशी बदलता येते. 

Typing help hide