धंदेवाईक शिक्षण संस्था

हा म.टा. मधला लेख की एखाद्या शिक्षण संस्थेची जाहिरात ?

नेटवर्किंग सोल्युशन्समध्ये करिअरला वाव

हा पूर्णं लेख कदाचित आवडला असता जर एकांद्या नावजलेल्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच नाव नाही आलं असत. अशा काहि नावाजलेल्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत मी आणि माझे किती तरी मित्र फसलो आहोत.

१. १०वी १२वी त असणाऱ्या मुलांना या प्रशिक्षण संस्थेत फक्त पैसा गोळा करण्यासाठी घेतलं जात.

२. या शिक्षण संस्थानाची फी २५,००० पासून ४५,००० असते.सॉफ्टवेअर क्षेत्रात १,००००० पर्यंत असते पण हार्डवेअर क्षेत्रात २५,००० घेण्याची गरज नाही हा अनुभव आहे.

३. हे शिक्षण घेऊन एवढी किंमत मोजून या क्षेत्रात टिकून राहण्याची तयारी नसल्यामुळे काही जण सोडून देतात तर काही जण काहीच कळत नाही म्हणून सोडून देतात.निदान मला तरी १२वी पर्यंत इंग्रजीच फ़ारस ज्ञान नसल्यामुळे या परीक्षेत पास झालो नाही.पण या क्षेत्रात टिकून राहण्याची जिद्द सोडली नाही कारण ३३,००० रु भरलेले. त्याचा फायदा होतोय म्हणा कारण वाणिज्य क्षेत्रात पदवीधर होऊन हि त्यात नोकरी करावीशी वाटली नाही.

४. हे शिक्षण संस्था जेवढे पैसे घेतात तितक्या सुविधा आणि ज्ञान पुरवतात का हा संशोधनाचा विषय असेल.

५.या क्षेत्रात धंदा करणं तितकं सोपं नाही कारण स्पर्धा वाढली आहे जिथे एका संगणक बांधणी मागे ४,००० मिळायचे तिथे सध्या १,५०० एवढ्येच मिळवता येतात.त्यामुळे नोकरी करणेच परवडेल.या नोकरीत सुरवातीला अक्षरशः हमालीची कामे करावी लागतात. पण यात ६महिने किंवा १ वर्ष घालवली तर पुढे नेटवर्किंग क्षेत्रात भरपूर वाव आणि पैसा आहे.पण यासाठी ह्यांच्या पदरात २५-४५००० टाकण गरजेच नाही.

यात माझा अनुभव असा की या शिक्षण संस्थांत जाण्यापेक्षा हार्डवेअर क्षेत्रासाठी इतका पैसा मोजणे गरजेचे नाही ते साध्या शिक्षण संस्थेत हि शिकता येत किंवा काम करुन हि हे ज्ञान मिळवता येत.

मनोगतीच या आणि अशा खाजगी शिक्षण संस्थां बाबतीत काय मत आहे ?