मे १६ २००७

डाळे लाडू

जिन्नस

  • डाळं ३ वाट्या पीठ होईल इतके
  • पीठीसाखर दीड वाटी
  • साजूक तूप १० चमचे

मार्गदर्शन

३ वाट्या पीठ होईल इतके डाळं घेणे. मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करून घेणे. नंतर त्यात साजूक तूप व साखर घालून हाताने/चमच्याने एकसारखे ढवळून मग त्याचे लाडू वळणे. ३ वाट्यांमधे साधारण १२ ते १५ लाडू होतात. वर साखरेचे व तुपाचे प्रमाण दिले असले तरीही साखरेचे प्रमाण ज्याप्रमाणात गोड आवडते त्या प्रमाणात. आणि तूपही लाडू वळतील इतपत घालणे. जी वाटी पीठाचे प्रमाण घ्यायला वापरतो तीच साखर घ्यायला वापरणे.

डाळं म्हणजे आपण जे चिवड्यात घालतो ते आहे.

टीपा

नाहीत.

माहितीचा स्रोत

तमिळ मैत्रिण सौ लक्ष्मी

Post to Feedडाळं लाडू चित्र
वा
९ लाडवांचा नैवेद्य
बेसनाचेच वाटतात. पण चव चांगली लागत असावी.
आभार
शंकानिरसन झाले
गुळ सुद्धा चालतो!
धन्यवाद

Typing help hide