जीव या गझलेत माझ्या

अनुताईंचा गाथा माझ्या गझलेची हा लेख वाचला आणि गझला न लिहिता आयत्या जमिनीवर विडंबनाची पिके घ्यायला सुरवात आम्ही का सुरवात केली ह्याची आठवण झाली..

जीव या गझलेत माझ्या फारसा नाही
'अनु'भव मला लिहिण्याचा फारसा नाही

का मला हे येत नव्हते गझल लिहिणे
(पाडण्याचा त्रास हा पण फारसा नाही)

गझल ही तर पाच शेरांची असे मोळी  
एकमेकांशी संबंध ज्यांचा फारसा नाही

मातरा झाल्या किती ते मोजले कोणी
मोजुनी उपयोग ही पण फारसा नाही

"केशवा" च्या लेखनाची काळजी नको   
कोण ही त्याला विचारत फारसा नाही

केशवसुमार...