रे सजणा......

रे सजणा.... बोल ना... बोल ना....
मनातला तराना... खोल ना... खोल ना....

कसे खुळ्या नभाचे... मनात गूज दाटे
तनूलतेस कैसे फुलून... यावेत काटे
जिवासही कशी रे.... गूढ संवेदना !
बोल ना... बोल ना... बोल ना...

इथे दाट जाळीत माझे... जपून ठेव घरटे
जरी दिशा-दिशांनी... पहाट-सांज सरते
श्वासात-ध्यासात तूच... तुझीच मीच सख्या रे
तुला पाहताना कसे हे... फुलून येती पिसारे
क्षणात होऊन जाते... तुझीच मी मोहना !
बोल ना... बोल ना... बोल ना....

रे सजणा... बोल ना... बोल ना...
मनातला तराना... खोल ना... खोल ना...