"बयो'ला "सर्वोत्कृष्ट संगीता'चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार!

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून आनंद झाला. सर्वांना आस्वाद घेता यावा म्हणून ती बातमी येथे उतरवून ठेवत आहे.

ईसकाळातली बातमी : "बयो'ला "सर्वोत्कृष्ट संगीता'चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार!

पुणे, ता. १० - ज्येष्ठ संगीतकार आणि सतारवादक पं. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित "बयो' चित्रपटाला स्पेन येथील प्रतिष्ठेच्या "माद्रिद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये "सर्वोत्कृष्ट संगीता'चा पुरस्कार मिळाला आहे. .........
""कथेशी एकरूप झालेल्या "बयो' चित्रपटाच्या संगीताला आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाल्याचा आनंद वाटतो,'' अशा शब्दांत पं. चंदावरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ""चित्रपटाचे संगीत ही वेगळ्या प्रकारची शिस्त असते. त्यामुळे त्याचे मूल्यमापन त्याच पद्धतीने व्हावे असे मला वाटते. "बयो'च्या निमित्ताने मराठी संगीत दिग्दर्शकाला प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद मोठा आहे. "बयो'चे संगीत पूर्णतः भारतीय रागदारी संगीतावर आधारले आहे. या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळात घडते. "बयो'च्या कथानकाला हे संगीत पुढे नेते, कथेशी एकरूप होते आणि चित्रपटाच्या एकूण आकलनात या संगीताची काही भूमिका आहे, हे तिकडच्या प्रेक्षकांनी- परीक्षकांनी जाणले, यामुळे या पुरस्काराचा आनंद वाटतो, असे ते म्हणाले.

या महोत्सवात या वर्षी सात भारतीय चित्रपटांचा समावेश होता. त्यातील "मातीमाय' आणि "बयो' हे दोन्ही मराठी चित्रपट पुरस्कारप्राप्त ठरले आहेत. योगायोग म्हणजे या दोन्ही चित्रपटांना पं. चंदावरकर यांचेच संगीत आहे.


बयो चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे / होता का?

आपल्यापैकी कुणी बयो किंवा मातीमाय हे चित्रपट पाहिले आहेत / पाहणार आहात काय?