अती मराठीकरण

            मराठी माध्यमाच्या विज्ञानाच्या पुस्तकात अनेक शब्दांचे अति मराठीकरण झाले आहे असे वाटते. त्यातल्या काही शब्दांचा आपल्याला अर्थ कळतो का पहा.

            जसे विद्युत चलित्र, रोहित्र, मिश्रणी, प्रशीतनी, वेधन, नालकुंतल, सूक्ष्मश्रवणी, विद्युन्मोच, हे शब्द अनुक्रमे electric motor, transformer, mixer, fridge, drilling, solenoid, microphone, electric discharge यासाठी वापरले आहेत. मी मान्य करतो की काही प्रयत्नांनंतर आपल्याला यांचा अर्थ कळेल. पण एवढ्या मराठीकरणाच्या अट्टाहासाची गरज आहे का? कारण असे मराठीकरण करताना वापरले जाणारे शब्द हे नेहमी वापरले जाणारे नसतात.(अपवाद वगळता). उलट यामुळे गोंधळच होण्याची शक्यता असते. तसेच शाळेत मराठीतून शिकल्यानंतर महाविद्यालयात इंग्रजी शब्द वापरणे कठीण जाते. (याचा अर्थ असा नव्हे की मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यम शाळेत चांगले.)

           याचा अर्थ व्यवहारात सर्वत्र इंग्रजी वापरावे असा मुळीच नाही. मराठीच वापरावे. पण गरज नसेल तेथे ते शब्द त्याच भाषेत ठेवावेत. जसे त्सुनामी.