जून २३ २००७

गोड लिंबू लोणचे

जिन्नस

  • लिंबू ६ (हिरव्या/पिवळ्या सालीचे)
  • लाल तिखट अदपाव वाटी
  • मीठ पाऊण वाटी
  • साखर पावणे दोन वाट्या
  • जीरे पूड अर्धा चमचा

मार्गदर्शन

६ पैकी ५ लिंबाच्या प्रत्येकी आठ फोडी करून त्यात लाल तिखट, मीठ, साखर व जीरेपूड घालून चमच्याने ढवळा/एकत्रीत करा. या मिश्रणाची चव घेऊन जे काही कमी वाटत आहे (तिखट, मीठ साखर) त्याप्रमाणे अजून थोडे  घालून ढवळा. नंतर काचेच्या बरणीमधे हे तयार झालेले लोणचे भरून ठेवा. बाटलीमधे भरल्यावर एक लिंबू चिरून त्याचा रस लोणच्यामधे पिळावा.  लिंबाच्या फोडी मुरायला बराच वेळ लागतो पण लोणच्याचा खार २-४ दिवसात तयार होतो.


रोहिणी

टीपा

हे लोणचे उपासाला चालते. शिवाय मेतकूट-तूप-भात याबरोबर खायलाही छान लागते.

माहितीचा स्रोत

माझी मामी

Post to Feedमस्त!
खरंच चित्र बघून..
सुन्दर
छान
मस्तच
छान.
आभार
लोणचे

Typing help hide