खजूर केक

  • खजूर १ कप, २ वाट्या मैदा, १ कप साखर, १ कप रिफाईंड तेल
  • १ १/२ कप दूध, १ चमचा सोडा , चिमूटभर मीठ व १ चमचा व्हॅनिला इसेन्स
१ तास
४ जणांना

एक कप दुधात बिनबियांचा खजूर अर्धा तास भिजत ठेवा.मैदा, मीठ व सोडा एकत्र चाळून घ्या.केकपत्राला तेल लावून ठेवा. एका भांड्यात तेल व पिठीसाखर फेटून घ्या त्यात दुधात भिजवलेला खजूर घालून २ मि. फेटा. त्यात थोडा-थोडा मैदा टाकून मिसळत जा. त्यात उरलेलं दूध घालून १ मि. फेटा. केकपात्रात मिश्रण ओतून ६०% पॉवर (५४०) १० मि.अतिसुक्ष्मलहर भट्टीत भाजून घ्या. किंवा  आधी गरम केलेल्या ओव्हन मध्ये १८० डिग्री तापमानावर ३० मि. बेक करा.

खास शाकाहारी केक.  आपल्या आवडीप्रमाणे आयसिंग करुन सजवा.

माझी बहीण रंजना