आंबा

सालाबादप्रमाणे यंदाही आपला आंब्यांचा सीझन येऊन गेला, सालाबादप्रमाणे यंदाही घेतलेल्या आंब्यांपैकी सुमारे ३० टक्के आंबे खराब निघाले. त्यावरून मनात एक विचार आला-- आम्ही येथे ऑस्ट्रेलियन, फिलिपिनो तसेच थाई आंबेपण घेऊन खातो. ह्या सर्वांना चवीच्या बाबतीत आपले हापूस पार मागे टाकतात. पण ह्या कुठल्याही आंब्याच्या बाबतीत फळ घेतले व ते खराब निघाले, असे आतापर्यंत तरी झालेले नाही. मग असे आपल्याच आंब्याच्या बाबतीत का व्हावे? निर्मिती- साखळीमधल्या (सप्लाय चेन) सर्व प्रक्रिया ह्या सर्वच आंब्यांना सारख्याच लागू आहेत (म्हणजे लागवड, जरूर त्या वेळी त्यांना झाडावरून उतरवणे, पॅकेजिंग इत्यादी). मग आपल्याच आंब्याच्या बाबतीत ही प्रॉडक्ट-क्वालिटीची रडारड का असावी? आणि जी काही कारणे असतील,  ती दूर कशी करता येतील? तज्ञांनी जरा ह्यावर कृपया प्रकाश टाकावा.