'मनोगत' वरील उत्कृष्ट कथा - एक आवाहन

''मनोगत' सर्वोत्तम' असा एक विशेषांक काढायचा ठरल्यास आपण 'मनोगत' वर आजवर प्रसिद्ध झालेल्या कथांपैकी कोणत्या पाच कथांची निवड कराल? (का हे सांगणे आवश्यक नाही.) कथेचे नाव, लेखकाचे / लेखिकेचे नाव व शक्य असल्यास प्रसिद्धीची तारीख यासह आपले मत द्यावे. (कथेचा दुवा देता आल्यास फारच उत्तम.) पाच कथांच्या यादीत उतरती भाजणी (सर्वोत्कृष्ट कथा पहिली, त्याखालोखाल दुसरी इ,) ठेवावी.