काही भाषिक पेच

मला पडलेले काही भाषिक पेच--

अभ्यास करणारा तो अभ्यासक, अभ्यास करणारी ती अभ्यासिका का नाही बरे?

बसने धडक दिली म्हणणे बरोबर की बशीने धडक दिली म्हणणे बरोबर? बसने धडक दिली असे योग्य असल्यास, घुशीने ऐवजी घूसने धान्याची नासाडी केली हेदेखील बरोबर का नाही?

ह्या प्रश्नांची कुणाजवळ उत्तरे असल्यास द्यावीत. तसेच इतरांनीही त्यांना पडलेले भाषिक पेच ह्या ठिकाणी द्यावेत, ही विनंती.