मनोगत वरील कविता

मला मनोगत वर काही काही खूपच उत्कृष्ट आणि दर्जेदार कविता वाचायला मिळाल्या. त्या शब्द सौंदर्याने मी आवक झालो.

पण बऱ्याच कविता अगदीच टुकार त्यांना 'र ला ट' जोडून केलेल्या म्हणणे म्हणजे र आणि ट चा अपमान होय.

अशी साहित्यिक बांडगुळे जी बहुमूल्य वेळेचे शोषण करतात, त्यांची वेळेच तिरडी बांधून सगळ्यांचा वेळ वाचवणे महत्त्वाचे आहे. किंवा त्यांच्या वर संस्कार करणे आवश्यक आहे.

काही लोक मलाच उलटा सल्ला देतील 'वाचता कशाला' अहो, भारता बाहेर राहून, प्रकाशीत मराठी वाचणे कसे टाळणार?

माझी तक्रार फक्त कविते बाबतीत आहे, गद्य साहित्य खूपच छान आहे....

- राज