नव उर्जा

जणू अस्तित्वाने नवी झळाळी ल्यावी

अन हातामध्ये वीज तळपती यावी

प्रवास जुना पण सरंजाम हा खाशा

नव ऊर्जेने मग चमके ललाटरेषा