हिंदू धर्मशास्त्रात कालवाचन

हिंदू धर्मशास्त्रात कालवाचन कसे करतात याविषयीची माहिती आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या

पुस्तकात वाचनात आली. त्याविषयी.

मृत्युलोकातील मनुष्यप्राण्याच्या कालगणनेप्रमाणे चार अब्ज बत्तीस हजार वर्षे संपतील, तेव्हा जगाचा कर्ता

असलेल्या ब्रह्मदेवाचा एक दिवस संपेल. अशा रितीने ब्रह्मदेवाची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा त्याची सृष्टी नाशाप्रत

जाईल. जगाची उत्पत्ती होऊन सध्या ब्रह्मदेवाची पन्नास वर्षे झाली आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपेपर्यंत 14

मन्वंतरे होतात. त्यापैकी स्वंयभू, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष ही मन्वंतरे झाली आहेत. सध्या

वैवस्वत मन्वंतर चालले आहे. यानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रूद्रसावर्णि, देवसावर्णि आणि

इंद्रसावर्णि ही सात मन्वंतरे यायची आहेत. प्रत्येक मनू 71 महायुगे असतो. एक महायुग 43, 20, 000 वर्षे

चालते. आतापर्यंत 27 महायुगे झाली आहेत. सध्या 28 वे महायुग चालले आहे. या 28 व्या महायुगातील

कृतयुग ((17,28,000 वर्षे), त्रेतायुग ( 12, 96, 000 वर्षे), द्वापारयुग ( 8, 64, 000 वर्षे) ही तीन लहान युगे

संपून चौथे कलियुग सध्या सुरू आहे. ते 4, 32 000 वर्षे चालेले. त्यातील सध्या 5079 वर्षे संपली.