अंकुर

तिच्यएकेक

मी माझ्या मैत्रिणीच्या घरून येत होतो. तिच्या भावाला काहीतरी घ्यायचं होत म्हणून तो दुकानात गेला. मी माझ्या स्कूटरवर उभा होतो.समोरून  एक खास "ठेवणीतलं" करुण हास्य घेऊन ५/६ वर्षांची मुलगी फ़ाटक्या कपड्यात, कडेवर १-दीड वर्षांच्या शेंबड्या मुलाला घेऊन समोर आली. ती मला बघून भीक मागू लागली.मी नाटकात काम करत असल्याने तिच ते खास भीक मागण्यासाठीच करुण हास्य मला कळाल होत.मी केवळ तिच्याकडे बघत होतो. ती मात्र चिकाटीने मला भीक मागत होती. मला काय सुचल माहीत नाही, मी एकदम तिला म्हटंल,"गाडी पूस तर ५रू देतो." ती नुसतीच बघून हसत होती आणि हात पुढे करत होती. २-३ वेळा अस झालं मग मला कळाल तिला बहुतेक मराठी येत नसावं. मी हिंदीत विचारल "गाडी साफ़ करेगी क्या?५ रूपये दुंगा" ती तशीच उभी या आशेत की हा बाबा आता तरी काही तरी देईल. तिची ती चिकाटी बघूनच लोक तिला भीक घालत असणार! तिच्या कडेवरच मूल आता चुळबूळ करायला लागलेल.मी तिला परत एकदा विचारल. तिने शेवटी त्याला खाली सोडल आणि ती पुढे आली. मी तिला गाडीतून कपडा काढून दिला आणि तिच्याकडून सगळी गाडी व्यवस्थित पुसून घेतली. तिनेही गाडी बरी पुसली. जेव्हा गाडी पुसून झाली आणि मी तिला ५रूपये दिले,तिच्या चेहरयावर हसू उमटल . ते हसू वेगळ होत.त्यात एक आंनद दिसला.यानंतर मी तिला कधी पाहिलंही नाही...