ईंग्लंड / परक्या देशांमधील लायब्ररीतील मराठी पुस्तके!

थोडासा वेगळा विषय आहे. मी ज्या शहरात राहातो त्याचे नांव रीडींग आहे. सध्या कामानिमित्त मी यु.के. मध्ये आहे. येथे असलेल्या लायब्ररीत असलेली मराठी पुस्तके बघितली की थक्क व्हायला होते. येथे वाचक अगदी ईमानेइतबारे पुस्तक परत करतात. येथे वपू काळेंची पुस्तके जास्त आहेत. तसेच काही तस्लिमा नासरीन ची पण पुस्तके आहेत. शिवाजीराव भोसले यांचे जागर आहे. इतरही आहेत. मी एवढी सगळी मराठी पुस्तके यु.के. मध्ये वाचायला मिळतील असा स्वप्नातही विचार केला नव्हता. ईतर दुसऱ्या देशात पण असेच आहे का? मी U.S.  बद्दल विचारू इच्छितो. कुणी सांगेल काय? जगभर मराठी माणसे आहेत, याचा मला फार अभिमान वाटतो.