आठवेल का सारं ?

आठवेल का सारं... मनात साठलेलं
अंतर्हृदयात.... खोल दाटलेलं !

आठवेल का सारं... ओठात जपलेलं
'बोलू का नको?'... आतच दडलेलं !

आठवेल का सारं... भेटलेलो आपण
दोन क्षण संगतीत... सरलेलं 'मी'पण !

आठवेल का सारं... ओथंबले घन
ओल्यागच्च धुक्यानं... वेढलेलं बन !

आठवेल का सारं... वळलेल्या दिशा
व्याकुळ नजरा... जीव वेडापिसा !

आठवेल का सारं... हात सुटताना
जुळलेली नाळ... क्षणात तुटताना !

आठवेल का सारं.................
सांग ना..... आठवेल का सारं ???