मनोगत दिवाळी अंक २००७ प्रकाशन

प्रिय मनोगती जन,

सर्व प्रथम, सर्व मनोगतींना दिवाळीच्या शुभेच्छा. मराठी संकेतस्थळांत दर्जा, सातत्य यामुळं उठून दिसणाऱ्या 'मनोगत'चा पहिलावहिला दिवाळी अंक सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

या अंकाच्या प्रवासात संपादक मंडळाला काही तांत्रिक अडचणीही आल्या. काही वेळा संपादक मंडळ देशोदेशी विखुरलेले असल्याने परस्परसंपर्कास वेळ लागला. प्रसंगी लिखाण पाठवणार्‍यांना काही युनिकोड संबंधित अडचणी आल्या. अर्थातच मनोगताचा हा पहिलाच अंक असल्याने काही अडचणी येणे स्वाभाविक होते. आणखी एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे हे संपादक मंडळ म्हणजे हजारांमध्ये सदस्य असणार्‍या पूर्ण मनोगताचे प्रतिनिधित्व नव्हे. त्यामुळे संपादक मंडळाने निवडलेले लिखाण हे सर्व मनोगतींना सर्वश्रेष्ठ वाटेल असे नव्हे, किंवा संपादक मंडळाला जागेमुळे निवडता न आलेले लिखाण सर्व मनोगतींना निवडलेल्या काही लिखाणापेक्षा जास्तही आवडू शकते. आलेल्या लिखाणातून निवड किंवा वगळ या गोष्टी आमच्यासाठीही अवघड होत्या. लिखाणाचे गुण आणि दर्जा हा बर्‍याचदा व्यक्तिसापेक्ष असतो. त्यामुळे ज्यांच्या लिखाणांची या अंकात निवड होऊ शकली नाही त्यांना ही विनंतिवजा आग्रह आहे की त्यांनी नाउमेद न होता लिहीत राहावे.

मनोगताच्या सर्व साहित्याप्रमाणे दिवाळी अंकातील साहित्यालाही आपल्याला प्रतिसाद देता येतील अशी सोय मनोगताच्या प्रशासनाने केली आहे. त्याबद्दल संपादक मंडळ आभारी आहे.

आपले,
मनोगत दिवाळी अंक २००७ संपादक मंडळ.


  • दिवाळी अंकातल्या ज्या लेखनावर प्रतिसाद असेल त्याचा उल्लेख प्रतिसादात केलात तर तो प्रतिसाद दिवाळी अंकात त्या लेखनाच्या खाली दाखवणे सुकर होईल.
  • सदस्यांप्रमाणे सदस्येतरांनाही दिवाळी अंकावर प्रतिसाद देता येईल. अडचण आल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे कळवावे.