झटपट लोणचे

  • लिंब -२
  • मोहरी पूड -१/२ चमचा
  • मेथीपूड - १ चिमूट
  • तिखट, मीठ - १ छोटा चमचा
  • हळद - १/२ चमचा
  • हिंग
  • तेल
१५ मिनिटे

   1. लिंबू स्वच्छ धूऊन पुसून घ्यावेत.
   2. एका लिंबाच्या ८ फोडी कराव्यात.
   3. लिंबात हळद, तिखट, मीठ  टाकून व्यवस्थीत हालवावे.
   4. २ तेल चमचे गरम करून त्याची फोडणी करावी. फोडणीत हिंग घालावे.
   5. गॅस बंद करून त्यात मोहरी, मेथी पूड घालावी.
   6. हे मिश्रण लिंबात टाकावे.
   7. दुसरे लिंबू चिरून त्याचा रस मिश्रणात पिळावा.
   8. चांगले मिसळून मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये एक मिनीट ठेवावे.
   9. थोडे गार झाल्यावर खावे.
  10. एकदम मुरल्यासारखे लागते.

जास्त वेळ ठेवल्यावर जळायची शक्यता असते.

माझा प्रयोग