हरबरा डाळीचे वडे

  • १ कप हरबरा डाळ
  • २ टेबलस्पून आले लसूण लगदा
  • २ टी स्पून हिरव्या मिरचीचा लगदा
  • १ कांदा बारीक चिरून
  • २ टीस्पून चिरलेला कढिलिंब
  • मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी
१५ मिनिटे
४ जण

हरबऱ्याची डाळ ३-४ तास थंड पाण्यात धुऊन भिजत घालावी ….नंतर त्यात लसूण ,आले ,मिरचीची पेस्ट ,मीठ टाकून मिक्सर मधून मिसळून घ्यावे अगदी कमी पाणी घालून….नंतर  त्यात कढीपत्ता ,कोथिंबीर व  कांदा टाकून गुलाबी रंगावर ,मध्यम ज्योतीवर वडे तळून घ्यावे.

1. ह्या वड्यांबरोबर हरबरा डाळीची  चटणी छान लागते ..ती वर वड्यासाठी जे पीठ तयार केले त्याचीच बनवायची त्यात जरा अजुन थोडे पाणी आणि दही टाकून मिसळून  घ्यावे एकजीव होईपर्यंत आणि वरुन फोडणी द्यायची. मोहरी, जीरा ,काडीपट्ता ,कोथिंबीर, आणि चवीपुरते मीठ टाकून.

2. दुपारच्या नाश्त्यासाठी करू शकता छान वाटेल.

माझी आई