" मर्फीचे नियम " - १

    ............... " मर्फीचे नियम " :- बसप्रवास ................

१. जर बाहेर खूप पाऊस येत असेल अथवा खूप थंडी असेल अथवा दोन्हीही असेल............

    तर बसला नक्की उशीर होणार ................

२. जर तुम्हाला बसमधून प्रवास करताना इच्छित स्थळी पोहचण्यास उशीर होत असेल ........

    तर बस ला सुद्धा पोहचण्यास उशीर होणार ..............

३. जर तुम्हाला असे वाटत असेल की इच्छित बस येण्यास खूप वेळ आहे,

    तर बस चे वेळापत्रक तपासा, एक तर ते चुकीचे  अथवा कालबाह्य अथवा एकाच वेळी दोन्हीही असेल .........

४. जर तुम्ही आधी आलात तर बस ला उशीर होणार आणि जर तुम्ही उशिरा आलात तर बस वेळेत येणार.....

५. जर तुमच्या कडे बसच्या तिकिटासाठी सुटे पैसे नसतील तर ते वाहकाकडे असण्याची शक्यता खूप कमी असते........

६. एकाच स्थळी जाणाऱ्या २ बसेस एकाच वेळी येतील पण महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हवी असणारी एकही नसेल..............

७. बसच्या पुढच्या भावावरील "मार्गदर्शक" पाट्या फक्त सजावटीच्या हेतूने लावल्या असल्याची शक्यता जास्त आहे ............

८. बसची प्रतीक्षा करण्यास लागणारा वेळ हा प्रवासाच्या एकूण वेळेपेक्षा जास्त असू शकतो......

९. जी बस तुम्ही पकडायचे ठरवत असाल ती नेहमी ५ मिनिटे आधी सुटते व जी बस तुम्ही पकडता ती नेहमी १० मिनिटे उशीराने पोहचते .............

१०. जर आज जास्तच गरम होत असेल तर बसच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड असण्याची शक्यता जास्त असते........

११. [float=font:vijay;place:top;]जर तुम्हाला तुमचा इच्छित थांबा माहीत नसेल आणि तुम्ही जास्त वेळा तो चालकास विचाराल तितकीच तो तुम्हाला योग्य वेळी सांगण्याची शक्यता कमी होत जाते.[/float]

१२. जर तुम्ही बसची पाट पाहून खूप कंटाळला आहात म्हणून तुम्ही "सिगारेट" काढता, जसे तुम्ही ती पेटवाल......... लगेच बस येईल.

    म्हणून...... बस लवकर यावी म्हणून तुम्ही "सिगारेट" पेटवली तर बस तर उशीर करेलच पण अशा चुकीच्या वेळी चुकीची व्यक्ती गाठ पडण्याची शक्यता जास्त असते...........

१३. जर तुम्हाला कोणत्याही परिस्थित आज बसने कोठे पोहोचायचे आहे तर आज बसचा संप असण्याची शक्यता सुद्धा तेवढीच जास्त आहे............

१४. तुम्ही जात असलेल्या मार्गावरच्या बसेस कोणत्याही वळी भरूनच जातात पण त्याच वेळी तुम्ही जात असताना परत येणाऱ्या बसेस मात्र रिकाम्या येतात.

  परत येताना वरचाच नियम लागू होतो............

१५. जर तुम्हाला खूप घाई असेल तर बसचा चालक नेहमी शिकाऊ असतो आणि प्रत्येक ठिकाणी सिग्नल "लाल" मिळतो..............

१६. जेव्हा तुम्ही बस पकडण्यासाठी गडबडीने जात आहात व "बस आली आहे का नाही ? " हे तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा बस दिसण्याची शक्यता अगदीच कमी असते.

पण जेव्हा तुम्ही मागे बघत नाही तेव्हा तुमच्या शेजारून बस निघून जाण्याची शक्यता जास्त असते...........

 १७. तुम्ही बसची वाट पाहून खूप कंटाळलेले आहात व तुम्ही निघून जाण्याचा निर्णय घेता. तेवढ्यात बस येते पण तुम्ही आता बस पकडणे अशक्य आहे  येवढ्या अंतरावर असता...........