वाचकांची पत्रे कशी लिहावीत??

मी रोज अनेक दैनिकांत वाचकांनी लिहिलेली पत्रे पाहतो ....आज काल ऑनलाईन पत्रे पाठवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण अशी पत्रे मराठी दैनिकांस कशी पाठवावीत??? कारण मी समजा जी मेल वापरून मटा दैनिकास पत्र पाठवण्याचा विचार करतोय तर आता जी मेल मध्ये असे युनिकोड वापरून लेखन कसे करावे?? की मी इंग्लिश मध्ये लिखाण करून ते त्याचे भाषांतर करतात??? मला नाही वाटत असं असेल.... आणि आपण सर्वच जाणता रोमन लिपी वापरून मराठीत लिहिलेले किती त्रास दायक ठरते... तर मग त्यांना प्रतिक्रिया ई मेल द्वारे कशी कळवायची ????