आज चे डॉक्टर लोक आदरणीय आहेत का??

डॉक्टरांचा एक लेख पाहिला आणि मनात खालील विचार आले

आज हे शिकाऊ डॉक्टर शिक्षणाचा कालावधी वाढवला म्हणून आंदोलन करत आहेत....त्यांची व्यथा बरोबर देखिल आहे... पण

पण आज जे प्रस्थापित डॉक्टर आहेत त्यांनी काय चालवलंय???

 आज किती डॉक्टर खरंच रुग्ण सेवा करण्यासाठी वेळ देतात??? बहुतांश हे पिळवणूक करतात आणि राग आणणारा प्रकार म्हणजे बहुतांश डॉक्टर रिंगण करून आधीच त्रस्त असलेल्या रुग्णाची आर्थिक पिळवणूक करतात,,... अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो... पण तुम्हाला नाही वाटत पॅथालोजी डॉक्टर आणि  जनरल फिजिशियन यांचे साटे लोटे  असते ??? म्हणजे बऱ्याचदा डॉक्टर एका विशिष्ट पथोलोजी लॅब मध्ये जाण्याचा का आग्रह करतात??? काही डॉक्टर मुद्दाम अशी औषधे लिहून देतात की जी फक्त त्यांच्याच शेजारील औषधी दुकानात मिळतात .... म्हणजे बघा त्या दुकान दाराचे आणि त्या डॉक्टर चे साटे लोटे असणारच! तोटा आम्हा रुग्णांचा होतो .... मी ऐकलंय की हे मेडिकल रेप्रेसेंटेटिव डॉक्टरांना भली मोठी गिफ्ट देतात आणि मग डॉक्टर लोक त्यांच्या कंपन्यांनीच बनवलेली (प्रसंगी महाग) औषधेच लिहून देतात... पुन्हा बोलण्याची चोरी कारण आम्ही पडलो वैद्यक क्षेत्रातले अडाणी ! माझ्या माहितीत असे देखील उदाहरणं आहेत की जे डॉक्टर औषध बनवणाऱ्या कंपनीच्या खर्चावर सहकुटुंब परदेश सहलीवर जाऊन आले... आता सांगा म्हणजे त्या डॉक्टर ने त्या कंपनीला किती मोठा नफा मिळवून दिला असणार !

आणि माझे फार्मसी या विषयातले ज्ञान खूप मोठे नाही... पण जे काही लक्षात येते त्या वरून असे दिसून येते की प्राथमिक औषधी ह्या काही शेकड्यामध्ये आहेत...पण प्रत्येक कंपनी सारख्याच आजारावर आपला एक नवीन ब्रँड काढावा तशी नवी गोळी काढते... आणि अगदी जीवनावश्यक औषधांवर देखील सरकारचे किमतीसाठी नियंत्रण नाही...

खरंच अशा वैद्यक क्षेत्राशी कोणाचाच संबंध येऊ नये असे वाटते...

सर्वेपी सुखिनः भवंतू सर्वेसंती निरामयः ।