तुझ्याही नकळत.....

तुझ्याही नकळत.....
तु माझ्यात सामावलेला आहेस,
माझ्या प्रत्येक आठवणीत, प्रत्येक स्वप्नात,
फक्त तु आणि तुच आहेस, ....तुझ्या नकळत.
तुला मी पाहील, तुझ बोलणे ऐकल, तुझ वागणे निरखल तुझ्या नकळत.
तुझ हसणे, तुझ रागावणे, तुझे चिडणे, तुझे समजावणे दुरुनच न्याहाळल ...तुझ्या नकळत.
माझे हे वागणे योग्य नव्हते, पण तरिही सगळे ठीकच होते, कारण हे चालले होते, तुझ्या नकळत.
हे सगळे काय हा प्रश्न पडला, मनाचा तोल होता ढळला, समजले हा जीव तुझ्यात गुंतला......तुझ्या आणि माझ्याही नकळत.