बिगरमराठींसाठी मराठी कोचिंग क्लासेस

आजच्य महाराष्ट्र टाईम्समध्ये ही बातमी वाचली आणि सर्वांना समजावी आणि तिच्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी म्हणून तिच्याविषयी माहिती येथे द्यावीशी वाटली.

म.टा.तली मूळ बातमी :  बिगरमराठींसाठी मराठी कोचिंग क्लासेस

बातमीचा गोषवारा :

... मुंबईतील बिगर मराठी लोकांना मराठीचे धडे देण्यासाठी मनसेच्या काही पदाधिका-यांनी मराठीचे क्लास सुरू करण्याचा निर्णय. ... अनेक कार्यर्कत्यांची मराठीचे धडे गिरवण्यास सुरुवात... कार्यकर्त्यांव्यतिरिक्त मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाने इथली भाषा, संस्कृतीशी जुळवून घेतलेच पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे. त्यासाठी मराठीचे क्लास लवकरच सुरू करण्याचा विचार : मनसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर....... मराठी शिकण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी योग्य प्रशिक्षण वर्गाची सोय नाही, अशा लोकांसाठीही मराठीचा क्लास उपयुक्त ठरु शकेल असा विश्वास. ...... सोप्या पद्धतीने मराठी कसे शिकवता येइल यासाठी मराठीतील तज्ज्ञ शिक्षकांची मदतही घेणार : मनसेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख अरविंद गावडे. ...... बोलीभाषेच्या क्लासची कल्पना अनेक खासगी शैक्षणिक संस्थांनीही उचलून धरली आहे....... पालिकेत, मंत्रालयात कामांसाठी जाणाऱ्या बिगरमराठी लोकांना या मराठी क्लासचा खूपच फायदा होइल. शिवाय मराठीच्या प्रसारातही यामुळे हातभार लागू शकेल या दृष्टीने काही संस्थात बोलीभाषेतील मराठी क्लासची आखणी....


भाषा, संस्कृतीशी जुळवून घेतलेच पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे. ... ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचा अनुभव काय आहे?

मराठी शिकण्यची इच्छा असलेले इतरभाषिक लोक तुमच्या पाहण्यात आहेत का? त्यांना मराठी शिकवण्याचा तुम्हाला काही अनुभव आहे का?

सोप्या पद्धतीने मराठी कसे शिकवता येईल?

बोलीभाषेच्या क्लासची कल्पना कितपत व्यापारी? कितपत कल्यणकारक? कितपत उपयोगी? असे तुम्हाला वाटते?

कुठल्या संस्थात अशा क्लासची आखणी चालू असावी?