मुद्राराक्षसाचा फसवण्याचा धंदा! (अं हं - हसवण्याचा)

पूर्वी काही मासिकांमध्ये "मुद्राराक्षसाचा विनोद" असा एक विभाग असायचा. त्यात काही वाक्ये असायची आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे. त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की हसता हसता पुरेवाट व्हायची. तशी काही वाक्ये मला सुचत आहेत. आपणा सर्वांना सुचत असतील तर आपणही सुचवू शकता.

(१) बातमी : कामाच्या दबावामुळे एका राज्यात एका दैनिकाची गोळी झाडून आत्महत्या! (सैनिकाची)

(२) बातमी : शाम रात्री जंगलातून पैसे घेवून परत येत होता तेव्हा एक मोराने बंदूकीचा धाक दाखवून त्याच्याजवळचा सगळा पैसा लुटला. (चोराने)

(३) बातमी : प्राणिसंग्रहालयात एका पिंजऱ्यात दोन सुंदर चोर पिसारा फुलवून नाचत होते. (मोर)

(४) भविष्य : या आठवड्यात मोठी झोप घेवू नये. (झेप)

(५) बातमी : अमरनगर मध्ये एका वृद्धेचा मुळा चिरून खुन! (गळा)

(६) एका लाकूडतोड्याने दिवसभर लाकडे तोडून तोडून त्याची एक पोळी बनवली. (मोळी)

(७) बातमी : दोन-तीन आमदारांचे नृत्य म्हणजे पुर्ण बिहारची भावना नव्हे : डॉ गवई (कृत्य)

(८) बातमी : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे सगळीकडे धूर आला असून, सगळीकडे मणीच मणी साचले आहे.(पूर, पाणी)

(९) बातमी : कॉल सेंटरच्या गाडीला झालेल्या अपघातात बघे जखमी. (तिघे)

अजून जसे सुचतील त्याप्रमाणे पुन्हा लिहेनच. आपण सर्वांनीही सुचवावे....