प्रवास मी एकटीच करते... (गीत)


अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

गुलाम जीवन खितपत मळले
नाव माझी धारेत डळमळे
कुठली नाही दिशाच ठावी
गांव कोठले मला न कळले

भाव भावनांचा बाजारी
एकटीच मी दारोदारी
विरक्त जीवन ईश्वर कोठे
भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

काव्य : गणेशा

राग : दयाघना
गीतकरण : स्वरांगी देव
संगीतकार : स्वरांगी देव