बांगड्याची हुमण ( गोव्याची किंवा कारवारी पध्द्त

  • मोठे बांगडे ४ ते ५ , लहान बांगडे ८ ते ९( ज्याला गोव्यात बांगुल्या म्हणतात)
  • ताज्या नारलाची अर्धी वाटी किंवा सुक्या नारळचा किस जो बाजारत मीळ्तो तो अर्ध्या वाटी पेक्षा कमी
  • तीखट लाल मीर्च्या(बेगडी) ५ ,लाल रंगाच्या (कश्मीरी मीर्च्या ३), हळद
  • १ चहाचा चमचा धणे, अटंबाची सोले (नसल्यास चिंच छोट्या लिंबा एव्हडी), आमसुले
  • १० ते १२ तीरफ़ळे एका वाटित थोडे पाणि घेउन भीजत ठेवणे
  • चवी पुरते मीठ
३० मिनिटे
६ ते ७ जणान साठी

बांगडा जेव्हडा घट्ट तेव्हडा चांगला. बांगडा निवडताना तोंडा कडे असलेल्या कल्ले जरा  वर करनु बघावा आत जर लाल असेल तर बांगडा ताजा. लाल डोळ्याचा बांगडा घेउ नये.

बांगड्याला खवले असतात ती सुरीने तासुन काढुन टाकावी. बांगड्याचे तोंड ही कापावे. त्याच्या पोटाला सुरीने उभे चीरुन आतली सर्व घाण काढावी, नळा खाली बांगडा स्वछ धुवावा. आड्वा करुन मोठ्या बांगड्याचे चार तुकडे करावे.शेपटि कडील खालचा भाग कापावा

जर बांगुल्या असतील तर त्या साफ़  अश्याच कराव्या पण त्यांचे तुकडे करु नये फ़क्त डोके व शेपटी कडचा भाग कापावा

नंतर बांगड्ताना थोडे मीठ लावुन थेवणे.

आता मीक्सर मघे नारळ, हळद, अटंबाची सोले किंवा चींच(इथे चींच वापरावी), बेगडि मीर्च्या व कश्मीरी मीरच्या,धणे घालुन बारीक वाट्ण काढावे.

ग़ॅस पेट्वुन त्या वर  पसरट पातेल ठेवावे.(गोव्यात बांगड्याया हुमणला कांद्याची फ़ोणी करत नाही वा तेलात ही वरील मसाला घालत नाही)

पातेल्यात बारीक वाट्लेले वाट्ण घालावे. त्यात तुम्हाला हवे तेव्हडे पाणी घालुन पातळ लरावे( बांगड्याचे हुमण हे जरा पातळ करतात.)

मग त्याला जरा उकळी आली की त्यात अटंबाची सोल किंवा आमसुले घालावी( इथे एक लक्क्षात ठेवावे की चींच घालु नये त्या जागी आमसुले घालावी)  जरा उकळी आली की त्यात बांगडे किंवा बांगुल्या घालावे( आपण बांगड्याना मीठ लावलेले आहे ते न विसरता  धुवुन घ्यावे नाहीतर सर्व हुमण खारट होइल)

मग त्यात चवी पुरते मीठ घालवे . बांगडे जास्त शेजवु नये नाहीतर फ़ुट्तील 

आपण जी तीरफ़ळे पाण्यात भीजत घातली आहीत ती पाण्यातुन बाहेर काढावी ( तीरफ़ळ हे नीट शोधावे तीरफ़ळ च्या मधे एक काळी बी असते ती तीरफ़ळे घेय नये.)  आणि जराशी ठेचुन घ्यावी. ह्या मुळे त्याचा जो एक वास असतो तो हुमणाला येउन बांगड्याचे हुमण छान लागते.

ज्याना जास्त तीखट हवे असल्यास तीखट बेड्गी मीरच्या जरा जास्त वापर्‍या व्या.

जरुर करुन बघा व प्रतीक्रीया कळ्वावी

नाहीत.