मार्च २३ २००८

किती विचित्र !

किती सुंदर भासतं हे जग
प्रेमात पडलेल्या जीवाला
विसरायला लावतं हे स्वतःला
पण किती वाईट असतं हेच
जेव्हा विसरायला लावतं त्याच प्रेमाला

हे सगळं  असं का  असतं विचित्र
इतकं की प्रश्न तरी विचारावा कुणाला
दृष्टीत ही  येत नाही तेव्हा
किनारा कुठे शोधावा
की बुडून जायचं धापा टाकत
स्वतःच निर्माण केलेल्या भोवऱ्यात
तळही दिसत नाही जिथे
त्या खोलखोल पाण्यात

इथे प्रश्न खूप आहेत
असले दोघांचे तरी
माझे माझे अन् तुझे तुझे
उत्तर दोघांच जुळलं ..तर
भेटू पुन्हा ....असेच
तोवर समाधान इतकेच
प्रश्न तरी जुळला आपला



 


 

छान आहे कविता !

Typing help hide