मार्च
२४
२००८
भोवती सगळेच जातीचे निघाले
कावळे ते सर्वपित्रीचे निघाले
लाल, भगवे, हात, हिरवे, आणि हत्ती
सर्व उत्सुक राजगादीचे निघाले
लाभता खुर्ची किती जडतात ह्यांना
शासकांचे रोग साथीचे निघाले
जे सभा जिंकून गेले भाषणाने
बाहुले निर्जीव, चावीचे निघाले
वासना वृद्धापकाळीही सुटेना
सर्व अनुयायी ययातीचे निघाले
हेच का स्वातंत्र्य ज्यासाठी हजारो
पुत्र फाशी हसत आईचे निघाले ?
सप्त सिंधूंचे नको आणूस पाणी
देवतांचे पाय मातीचे निघाले
(मोह झाला का सवंगाचा तुलाही ?
काव्य करता वाक्य टाळीचे निघाले...)
कावळे ते सर्वपित्रीचे निघाले
लाल, भगवे, हात, हिरवे, आणि हत्ती
सर्व उत्सुक राजगादीचे निघाले
लाभता खुर्ची किती जडतात ह्यांना
शासकांचे रोग साथीचे निघाले
जे सभा जिंकून गेले भाषणाने
बाहुले निर्जीव, चावीचे निघाले
वासना वृद्धापकाळीही सुटेना
सर्व अनुयायी ययातीचे निघाले
हेच का स्वातंत्र्य ज्यासाठी हजारो
पुत्र फाशी हसत आईचे निघाले ?
सप्त सिंधूंचे नको आणूस पाणी
देवतांचे पाय मातीचे निघाले
(मोह झाला का सवंगाचा तुलाही ?
काव्य करता वाक्य टाळीचे निघाले...)
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
चांगला शेर
प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., २४/०३/२००८ - १४:३६).
वा!
प्रे. सर्वसाक्षी (सोम., २४/०३/२००८ - १५:०६).
वा!
प्रे. केशवसुमार (सोम., २४/०३/२००८ - १६:४३).
वा!!!
प्रे. चक्रपाणि (सोम., २४/०३/२००८ - १६:५१).
मस्त
प्रे. सुवर्णमयी (सोम., २४/०३/२००८ - १६:५७).
सुंदर.
प्रे. बकुळ (सोम., २४/०३/२००८ - १७:५६).
वा!
प्रे. सन्जोप राव (सोम., २४/०३/२००८ - २१:२८).
सहमत
प्रे. मीरा फाटक (मंगळ., २५/०३/२००८ - ०४:५२).
अहाहा!
प्रे. अदिती (मंगळ., २५/०३/२००८ - १२:४२).
अगदी सहमत
प्रे. पुलस्ति (मंगळ., २५/०३/२००८ - १५:५३).
अगदी असेच
प्रे. जीवन जिज्ञासा (मंगळ., २५/०३/२००८ - १७:०९).
अतिशय छान.
प्रे. पराग जोगळेकर (मंगळ., २५/०३/२००८ - १३:४३).
सहमत
प्रे. सतिश वाघमारे (मंगळ., २५/०३/२००८ - १६:२१).
अतिशय सुंदर
प्रे. वेदा (मंगळ., २५/०३/२००८ - १७:३६).
वा!
प्रे. अजब (बुध., २६/०३/२००८ - ०५:०७).
फ़क्त उपहास एवढेच .......
प्रे. सुधीर कांदळकर (गुरु., २७/०३/२००८ - १४:३७).
नतमस्तक!
प्रे. जयन्ता५२ (रवि., ०६/०४/२००८ - ०६:३८).
अप्रतिम!!
प्रे. ऋषिकेश दाभोळकर (रवि., २०/०४/२००८ - १३:२०).
अत्युत्तम
प्रे. कुशाग्र (शुक्र., २५/०४/२००८ - ०९:३३).
उत्तम
प्रे. ओन्कारस्वरुप (गुरु., १५/०५/२००८ - २०:३७).
