मार्च
२५
२००८
महेशशेठनी केलेले सुंदर विडंबन झोप आल्यावाचून लोळायचे वाचून आमची झोप उडाली (महेशशेठ, तुम्ही सुद्धा !!) मग जालावरून मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना दिवस तुझे हे फुलायचे शोधणे आले आणि मग पुढचं सगळे नेहमीचेच..गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता..
दिवस जुने ते स्मरायचे
आठवणी काढून हसायचे
रस्त्यात हिंडत जाणे
वाटेत शोध बे दाणे
चकण्यास दाणे ते असायचे
गाठावी मित्राची खोली
जमावी पारटी ओली
ग्लासात वारुणी भरायचे
भरारे ग्लास हे पार
वाटावा सुरे चा भार
घोटात रिकामे करायचे
माझ्या तू घरच्यापाशी
थांबव गाडी जराशी
पायऱ्या चुकून पडायचे
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
काय हे?
प्रे. खोडसाळ (बुध., २६/०३/२००८ - ०१:५३).
विडंबनहि गेय ........
प्रे. सुधीर कांदळकर (गुरु., २७/०३/२००८ - १५:१५).
माझ्या तू घरच्यापाशी..
प्रे. सतिश वाघमारे (शनि., २९/०३/२००८ - १३:२०).
