मार्च २६ २००८

मंगळ - मंगल कि अमंगल

प्रिय मनोगती,

आपण सर्व हे जाणतोच की आपल्याकडे लग्नापूर्वी कुंडली पाहतात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीस किंवा मुलास मंगळ आहे का नाही हे पाहतात.

माझ्या एका मित्राचे आणि मैत्रिणीचे असेच झाले आहे. दोघांचे एकमेकावर प्रेम आहे पण मुलीला पत्रिकेत मंगळ असल्याने दोघास घरातून विरोध होत आहे.

दोघांचाही पत्रिकेवर विश्वास नाहीये पण घरातल्यांच्या विरोधात ही जायचे नाहीये त्यामुळे दोघेही विचित्र अशा द्विधा मनस्थितीत आहेत.

अशी उदाहरणे पाहिली की वाटते मने जुळल्यावर खरंच असे पत्रिका पाहणे जरूरीचे आहे का?

तुम्ही मदत करू शकाल का याबाबतीत?

पत्रिका पाहणे जरूरीचे नाही
त्यापेक्षा असे करा...
धन्यवाद निमिष!
लगे रहो मुन्नाभाई पाहिला का?
100% सहमत
मंगल
ग्रह आणि माणूस

Typing help hide