कोलंबी मसाला

  • १/२ किलो कोलंबी
  • १/२ वाटी चिंचेचा दाट कोळ
  • १ मोठा चमचा गरम मसाला
  • २ चमचे आल-लसुण-मिर्चि-कोथिंबिर वाटण
  • २ कांदे बारिक चिरून
  • ३-४ लसूण पाकळ्या
१५ मिनिटे

कोलंबीचे धागे काढून, धुऊन घ्यावी. कोलंबीला लाल तिखट २ चमचे किंवा आवडी प्रमाणे अधिक, हळद १ चमचा आणि मीठ चवीप्रमाणे लावावे, मग वाटण आणि कोळ लावून मुरण्या साथी ठेवून द्यावे.

थोड्या वेळाने कढईत ४ चमचे तेल घेऊन त्यावर लसूण काळा होईपर्यंत परतावा. मग कांदा गुलाबी रंगावर परतून त्यावर मुरलेली कोलंबी ५ मिनिटे परतावी.

कोलंबी शिजत आली की त्यात गरम मसाला घालावा आणि चांगले परतावे. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी.

सोबत चिरलेले कांदा - लिंबू द्यावे.

पोळीबरोबर अथवा थंड पेयांबरोबर हा पदार्थ चांगला लागतो असे माझ्या नवऱ्याचे म्हणणे आहे.

सौ. ताई