खरा शब्द कुठला?

मृदुलाताईंनी मला वैयक्तिक निरोपाने एक प्रश्न विचारला होता.  आंतर्देशीय म्हणजे देशान्तर्गत का दोन (किंवा) अधिक देशामधला असा तो प्रश्न होता.  मला वाटले की जाणकार मनोगती याचा उकल चांगला करतील.  सध्या माझा मेंदू एव्हढा कार्यक्षम नाही.


तो निरोप इथे उद्धृत करूत आहे.


कलोअ,
सुभाष


***********



नमस्कार भाष,


उत्खननात आता 'आंतर्देशीय सामन्यांचे निकाल' नावाची तुम्ही सुरू केलेली चर्चा वाचली. शंका मूळ मुद्द्याला सोडून असल्याने निरोप लिहीत आहे.
'आंतर्देशीय पत्र' म्हणजे देशांतर्गत ठिकाणी पाठवता येणारे. त्यावरून आंतर्देशीय सामने म्हणजे रणजी वगैरे नव्हेत का? म्हणजे इन्ट्रानॅशनल? इंटरनॅशनलला मराठीत काय म्हणायचे? आंतरराष्ट्रीय? किंवा आंतरराष्ट्रीय=आंतर्देशीय असेल तर देशांतर्गत खेळल्या जाणार्‍या सामन्यांना काय म्हणायचे?


मृदुला.


तुमचे म्हणणे बरोबर आहे.  माझ्या मते "अंतर" देशीय आणि आंतर्देशीय" असे इंग्रजी मधल्या "इंटर" आणि "इंट्रा" असा फरक दाखविणारे दोन शब्द आहेत.  आंतर्राष्ट्रीय लिहिल्याने तो फरक जाणवणार नाही कारण आंतर्राष्ट्रीय=इंटरनॅशनल हे रूढ समीकरण आहे.


चला आपण मनोगतींनाच विचारू या हा प्रश्न !!!!


(मार्गशोधक) सुभाष