रस्त्यांवर प्रथम हक्क कोणाचा

गेली काही वर्षे मुंबई नाशिक प्रवास करताना आलेला अनुभव. वर्षाच्या ठराविक वेळी काही लोकांचा जथ्था चालत चालत मुंबईहून निघतो आणि नाशिकच्या पुढे एका धार्मिक स्थळाच्या दिशेने जातो. अशावेळी वाहनाना येणाऱ्या काही अडचणी

  • एक बाजू पुर्णपणे अडवली गेल्यामुळे , दुहेरी वाहतुकीस प्रचंड अडथळा.
  • ह्या लोकां बरोबर एक वाहन असते ज्यात खाण्या पिण्याची व्यवस्था असते. ज्या ठिकाणी हे लोक खाणे पिणे उरकतात त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग असतो
  • ह्यातले काही लोक जवळून जाणाऱ्या वाहनावर काठ्या मारतात आणि उद्दामपणे दूरून जायचि खूण करतात. त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नसतो कारण त्यांची संख्या जास्त असते
  • ह्यामुळे लोकांची कामे खोळंबतात , माल वेळच्यावेळी पोहचू शकत नाही, रुग्णसेविकेतून जाणाऱ्या रुग्णांचे किती हाल होत असतील
  • एक गावाहून दुसऱ्या गावी होणारी वाहतूक सुरळित व्हावी म्हणून रस्ते तयार केलेले असतात . ह्या रस्त्यांवरून पायी प्रवास अपेक्षित नसतो . तसे असल्यास त्या साठी पर्यायी व्यवस्था , उदा. पदपथ, जागोजागी विश्रांती साठी सोयी इ. अस्तित्वात आली असती.
  • त्यातल्या काही लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे धक्के लागून अपघात हि झालेले आहेत.

हे विचार मांडण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवण्याचा नसून , वाहतुकीस येणाऱ्या अडचणी मांडण्याचा आहे.

स्वतःच्या पुण्यकमाई साठी दुसऱ्याना असे वेठीस धरणे योग्य आहे का ?