तू

तूही पाऊसारखा वागायचास

पाऊसारखीच आपली अचानक भेट

पाऊसारखाच तूही लहरी

वेळी अवेळी तुझ येण

माझी ना ऐकताच

पाऊसासारखच तूझ कोसळन

तूझ रागवण आणि माझ मनवण.......

तू गोड हसल्यावर जणू

इंद्रधणू पसरायचा

सहवासात तूझ्या प्रत्येक क्षण

नव्याने हिरवळायचा........

सार आयुष्य अर्पूण तूला

मी सर्वस्वी तूझी होते

खर सांग .......

ते प्रेम होत की

मला झालेले भास होते

तू बरसलेल्या प्रेमात

मी फूलले.... खुलले

जिवनातले सारे मोहक रंग

तूझ्यामुळेच मी पाहिले

त्याच रंगांची

अशी उधळण होइल

कधीच वाटल नव्हत........

खरच पाऊसा आधीच मळभ

मी एकदातरी पाहिल असत तर...............

---------------------------------------अमोल