पातवड्याची आमटी

  • डाळीचे पीठ - १ पेला
  • फोडणीचे साहित्य - तेल, हिंग, हळद, तिखटपूड, मोहरी.
  • २ हिरव्या मिरच्या, १ गड्डा लसूण एकत्र वाटून घ्यावेत,
  • ओवा व मीठ.
  • सुख्या खोबऱ्याचा कीस व कोथंबीर
  • आमटीसाठी - तेल अर्धी वाटी
  • आमटीसाठी - फोडणीचे साहित्य
  • आमटीसाठी - लसूण व आले वाटून
  • आमटीसाठी - कांदा वाटून
३० मिनिटे
४ जणांसाठी

पीठ मध्यम/जाडसर घट्ट भिजवून घ्यावे.
पीठात ओवा, मीठ, हिरव्या मिरच्या लसणाचे वाटण, कोथंबीर  घालावे व चांगले मिश्रण करावे.
एका कढईत २ टेबल स्पून तेल तापत ठेवून फोडणी तयार करावी.
पीठ फोडणीला टाकून कालथ्याने पीठ ढवळावे.
आवडीनुसार मीठ घालावे.
पीठ वाफेवर शिजे पर्यंत अधून मधून ढवळत राहावे.
चांगले शिजले की गरम गरम पिठ (पीठले) एका तेल लावलेल्या थाळीत ओतावे व थापून घ्यावे.
वरून खोबऱ्याचा कीस व थोडी कोथंबीर  भुरभुरावी.
ह्या पीठल्याच्या वड्या (गुळपापडी च्या आकाराच्या) पाडून घ्याव्यात.

आमटीची कृतीः
दुसऱ्या बाजूला भांडे किंवा कढई गॅस वर ठेऊन त्यात तेल तापवायला ठेवावे. 
तेल कडकडीत तापले की त्यात फोडणीसाठी साहीत्य टाकावे त्यात मोहरी, जीरें, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, लसूण-आले, मसाला व शेवटी कांद्याचे वाटण टाकावे.  
कांदा चांगला लाल होईपर्यंत व तेल सुटे पर्यंत परतावा - तो पर्यंत दूसऱ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे.
पाण्याला ऊकळी आली की ते पाणी मसाल्यात मिसळून मिठ टाकावे व १ ऊकळी येऊ द्यावी.
ह्या उकळी आलेल्या आमटीत पिठल्याच्या वड्या हळू हळू सोडाव्यात.

तयार पातवड्याची आमटी.

नुसत्या वड्या ही खायला चांगल्या लागतात.
आमटी शक्यतो पातळ करावी कारण वड्या सोडल्यावर थोडी दाट होते.
गरम गरम भात / पोळीबरोबर किंवा नुसती खावी.
खाताना कांदा चिरून घेण्यास विसरू नये.
चवी प्रमाणे तिखट मिठाचे प्रमाण कमी जास्त करावे.  
पाणी उकळलेले वापरल्यास आमटीतल्या मसाल्याची चव कायम राहते.

आई - (हा खानदेशी प्रकार आहे.)