शाकाहारी बिर्याणी

  • १ वाटी बास्मती तांदूळ
  • भाज्या : - १ लाल गाजर, १ सिमला मिरची, कोबी, १० फरसबी च्या शेंगा, १ कांदा, कोथिंबीर, १/२ वाटी मटार
  • १ टी. स्पून आले-लसूण पेस्ट, १ टी. स्पून हिरवी मिर्ची पेस्ट
  • थोडे दही, तेल, मीठ
  • १ टे. स्पून बिर्याणी मसाला (एव्रेस्ट / सुहाना दोन्ही चांगले आहेत )
  • काजू, बेदाणे
३० मिनिटे
३-४ जणांसाठी

१. प्रथम भात शिजवून घ्यावा. ( १ वाटी तांदुळास २ वाट्या पाणी )
२. त्या भातास तेलाचा हात लावून मीठ लावून घ्यावे व तो मोकळा करून पसरून ठेवावा.
३. सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्या व अर्ध्वट उकडून घ्याव्या. (खूप शिजलेल्या भाज्या मउ पडतात,
    अर्ध्वट कच्च्या भाज्या दिसायला पण चांगल्या दिसतात )
४. कांदा उभा चिरून १ चमचा तेलात तांबूस होईपर्यंत परतावा.
५. त्यात आले लसूण पेस्ट व हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी.
६. सगळ्या भाज्या त्यात घालून परताव्या.
७. बिर्यणी मसाला थोड्या दह्यात मिसळून कढईत घालावा.
८. आता मोकळा झालेला भात घालून ४-५ मि. परतावे.
९. झाली व्हेज बिर्याणी तयार. त्यावर काजू, कांदा तळून घालावा. व बेदाणे आणि कोथिंबीर घालून सजवावे.

नाहीत.

मी स्वतः