राजकुमार तो स्वप्नातला.....

वेडं वय, वेड्या आश्या,
आश्या गोष्टितुन ऐकलेल्या राजकुमाराच्या
राजकुमाराच्या संगे जाण्याच्या,
जाण्याच्या अन स्वप्नगरी बघण्याच्या....

राजकुमार तो स्वप्नातला,
स्वप्नातला सत्यात येईल का?
का खरेच ह्या मीरेला,
मीरेला कॄष्ण गवसेल का??.. .

असेल का खरचं असा कोणी,
कोणी जो स्वप्नात येतो
येतो शुभ्र अश्वावर,
अश्वावर बसवून मला नेतो...

वर्षा मागून उलटली वर्ष,
वर्ष हेही जाईल निघून
निघून जातील क्षण सारे,
सारे जातील त्याचीच वाट बघून...

मन म्हणतय येईल तो,
तो मात्र कुठे दिसत नाही
नाही चाहूल एकही त्याची,
त्याची स्वप्ने मात्र पडती अजुनही...

स्वप्न आणि सत्यातला हा फ़रक,
फ़रक आज मला उलगडला
उलगडला तो राजकुमार गोष्टितला,
गोष्टितला जो वास्तवात कधी न येणार....
कधी न येणार....

-अवंती.