शुभेच्छा...

आज तुझा वाढदिवस...     खुप खुप शुभेच्छा.    

खर तर आज शुभेच्छा खेरीच मी तुला काहिच देऊ शकत नाही, कारण कहिशे मैल अंतर... तुझा वाढदिवस सेलिब्रेट करावा असं खुप खुप वाटत होतं पण.... हा "पण" ना खुप खुप चालबाज आहे गं. नेहमी तो असंच खेळ करत असतो.

            तुला सारखं भेटावसं वाटतं "पण" मी इकडे साऊथ इंडियात. असं वाटत असतं की साऊथ आफ्रिकेच्या जंगलात तर नाही ना मी. पुण्यात आलं की प्रत्येक वेळी तुला भेटायचा खुप प्रयत्न करत असतो "पण" तु कामात बिजी हे नेहमीचचं. सारखं फोन करावा हे काही बरं नाही. आणि आता तर तु क्लास पण घेतेस. "पण" एकदा तरी सांगायचस ना मला. मन अगदी चलबिचल होऊन जायचं गं तु फोन बंद केल्यावर. हल्ली आपण भेटतो "पण" फार थोड्यावेळेसाठी. खुप खुप बोलायचं असतं "पण" घड्याळ/वेळ अगदी शर्यतीत धावल्यासारखं पळतच सुटलेला असतो.   मनभरून बोलणंतर दुरच साधं मनभरून बघणं "पण" होत नाही.   याला आपण काहिच नाही करू शकत,   किंवा यात कुणाचाही दोषही नाही.

            मी तुला हे का सांगतो आहे असा प्रश्न तुला पडत असणार. याचं उत्तर मला खुप आधी मिळालय गं. "मला तु आवडतेस, प्रेम आहेगं तुझ्यावर".   आत्ता सुद्धा मला आठवतो एक एक क्षण आपण बरोबर असतांना. पावसात भिजत भिजत आईस्क्रिम खाल्लेला तो दिवस.. नकळत तु भिजू नये म्हणून धरलेली ती छत्री, तो क्षण ,  सगळ्यांनी किती तरी दिवस पिळलं मला यावरून.  एकाच बाकावर आपण बसत असलेला प्रत्येक क्षण. दुसरं कुणी बसले तर होत असलेली माझी चिडचिड. जागा अडवून ठेवण्यासाठी केलेली कसरत. तु बरोबर असाविस म्हणून नेहमीच्या बसऐवजी १२२ नि जाण्याचा आटोक्याचा प्रयत्न. कधी कधी तुलाच २०४/३६ ने येण्यासाठी घातलेली साकडं.  मॉडर्न मधून निघतांना मला विचारणं " तु येणार आहेस का? ". मग मी जर बरोबर निघालो तर सगळ्यांच्या कॉमेंटस... कधी कधी थेट घरा पर्यंत सोडायला येणं. तु बरोबर असतांना तुळशी बागेत जातांनचा क्षण कधीच नाही ग विसरणार. गणपतीत आपण जाईट व्हिल मध्ये बसलेला तो क्षण.. तु बरोबर असलीस ना की सगळं, अगदी सगळं विसरायला होतं.

             फोन वर बोलतांना ऊगाच प्राची या अस्तीत्वात नसलेल्या पात्रा साठी मला खेचणं. आणि शक्य तितके तुज्याशी मिळते जुळते वर्णन करणं. "कळतयं पण वळत नाही" याची नितळ कबुली. कधी वळेल? ह्या तु केलेल्या प्रश्नाला "वेळ येऊदे गं, मग सांगेन, प्रत्येक गोष्टी ची एक वेळ असते" हा माझा थोडा पोक्त विचार वजा प्रतीऊत्तर. तु मागीतलेल्या गोष्टी मिळवण्यासाठीच्या धडपडीतली मजा. कधी कधी फोनवरच रंग संगती ची चौकशी. बोलतांना तुझे कही टिपिकल शब्द, की जे मी तुला परत परत म्हणायला लावणं. हा$ हा$ हा $ जर परफेक्ट नाही झालं तर त्याची तु स्वतःहून दिलेली कबुली, मी ए म्हणालो की तु  बी,  सी,  डी, ई, एफ, जी एका दमात म्हणायचीस,  आणि बाकी च नंतर शिकविण असं मास्तरीण बाईं सारखं सांगणं, सगळं, सगळ आठवतयं ना मला?

          तु माझ्या वाढदिवसाला वेगळ्या रितीने शुभेच्छा दिल्यास..  म्हणजे अगदी ११ मे च्या शेवटाला आणि १२ मे च्या सुरुवातीला.  तुला माहीत नसेल कदाचीत पण मी खुप आतुरतेने वाट बघत होतो.  मला वाटलं होतं की नाही येणाऱ तुझा फोन. जर फोन आला तर मी पार्टी देईन असं नेहमी सारखं कमिट केलं होतं. सध्या अश्या पार्टीच्या कमिटमेंट खुप देतोय मी.. तु बेट लावलीस की तुम्ही सगळे भेटणार मी पुण्यात यायच्याआत, आणि मी येण्याच्या दिवशीच तुम्ही भेटलांत. आणि मी बेट हरलो, अश्या हजारो बेट हरेन गं, तु जिंकण्यासाठी...

शेवटी पुन्हा एकदा शुभेच्छा...