सावळी मी

सावळी मी सावळी गं
जशी रात काजळी गं
चंद्र जपते जीवात
चांदण्या मी उजळी गं

सावळं ग अंग अंग
सावळा गं सखे रंग
सावळ्या देहात आंत
श्वेत फुले अंतरंग

माझ्या सावळी चे बाई
मन "सावळ्या"त आहे
मन "सावळ्यात" नि गं
"सावळा" माझ्यात राहे

सावळ्या ग रंगाची मी
कशी किती सांगू गाथा
सावळा गं रामचंद्र.
"शाम" सावळा गं होता