कुळथाचे (हुलग्याचे)पिठले.

  • कुळीथ पीठ १/२ वाटी
  • ३ ते ४ हिरव्या मिरच्या
  • ६ते ७ लसूण पाकळ्या
  • एखादे आमसुल
  • ओले/सुके खोबरे, कोथिंबिर
  • तेल, मीठ, फोडणीचे साहित्य
३० मिनिटे
४ जणांना

कुळथाच्या पीठात ३ ते ४ वाट्या पाणी घालून कालवून घ्यावे, त्यात मीठ घालावे.
तेलाची खमंग फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या, मिरच्या, आमसूल घालावे. व हे कुळथाचे पीठ घालावे. खोबरे व कोथिंबिर घालावे. खळखळून उकळू द्यावे, चांगले शिजू द्यावे.
(काही जण फोडणीत पाणी घालून उकळतात व त्यात पीठ घालतात, पण गुठळ्या टाळण्यासाठी आधी पीठ पाण्यात कालवून मग फोडणीत घालणे चांगले. म्हणजे मी तरी तसे करते. )

हे पिठले पातळच करावे व गरम गरम पिठले वाफाळत्या भाताबरोबर खावे. सोबत पोह्याचा पापड नाहीतर मिरगुंडे आणि सांडगी मिरची असावी, बाहेर पाऊस कोसळत असावा...

.